राजेंद्र वड्डर : अतिरिक्त जिल्हाधिकार्यांना निवेदन
निपाणी : दोन वर्षांपूर्वी सन 2019 साली अतिवृष्टी आणि महापूर परिस्थितीच्यावेळी निपाणी तालुक्यातील पडलेल्या घरांचा सर्वे करून त्यांना नवीन घरे बांधून देण्याची तयारी सरकारने दर्शविली होती. पण दोन वर्षाच्या काळात 594 घरे पूरग्रस्तांना बांधून देता आलेली नाही मात्र आता नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी काळात पडलेल्या घरांचा सर्वे करणे कितपत योग्य आहे. त्यामुळे दोन वर्षापूर्वीच्या या लाभार्थ्यांना घरकुले बांधून देण्याच्या मागणीचे निवेदन भोज जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर पवार यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक दुडगुंदी यांना देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी की, सन 2019 साली पूर आणि अतिवृष्टीच्या वेळी निपाणी तालुकामधील नदीकाठच्या गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरून मोठी पडझड झाली होती. शिवाय घराच्या भिंतीला पाणी लागून कोसळल्या होत्या. महसूल खात्यातर्फे प्रत्येक गावात भेट देऊन पडझड झालेल्या घरांचा सर्वे करण्यात आला होता. त्याचप्रमाणे तत्कालीन लोकप्रतिनिधी आणि मुख्यमंत्र्यांनीही पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या होत्या. यावेळी दरवर्षी पूरपरिस्थिती उद्भवणार्या निपाणी तालुक्यातील 594 लाभार्थींना घरे बांधून देण्याचा निर्णय झाला होता. पण आजतागायत त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे अनेक पूरग्रस्त अजूनही वार्यावरच आहेत. अशा परिस्थितीत नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा सर्वे करून घरांची नुकसान भरपाई निश्चित केले जात आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी आणि कुटुंबावर अन्याय झाला असून त्यांना तात्काळ न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी बेळगाव जिल्हा वड्डर समाजाचे संचालक बाबू कागलकर, दगडू वड्डर उपस्थित होते.
Check Also
ज्येष्ठ साहित्यिक प्रा.अजित सगरे यांचे निधन
Spread the love निपाणी (वार्ता) : सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात सतत कार्यरत असणारे निपाणी येथील …