श्रीनिवास चोपडे ; ख्रिस्ती समाज जागेची बेकायदेशीर विक्री
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील अक्कोळ क्रॉस नजिकच्या ख्रिश्चन समाजाची १३१ /बी या जागेची काही लोकांनी बेकायदेशीर आणि कागदोपत्रांची पडताळणी न करता विक्री केली आहे. सदरची जागाही कोईमारची असून ती कोल्हापूर चर्च कौन्सिलला लिजवर दिले आहे. येथे विद्यार्थ्यांचे वस्तीगृह आणि ज्ञानदान होत असताना त्याची विक्री झाली आहे. संबंधितांनी कायदेशीर दस्तऐवज घेऊन या प्रकरणाची निपक्षपणे चौकशी करून समाजाला न्याय देण्याची मागणी कोईमार कौन्सिलचे व्यवस्थापक श्रीनिवास चोपडे यांनी केली आहे. येथे आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
चोपडे म्हणाले, कोईमार ट्रस्ट केडी ११ धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत आहे. १९६७ ला बोर्ड ऑफ फॉरेन मिशनकडून कोईमारला या जागेचे सर्व अधिकार दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र पब्लिक ट्रस्टच्या कायद्यानुसार यामध्ये ट्रस्टी निर्माण केले असून त्यानुसार या जागेची नोंद असून धर्मादाय आयुक्तांकडे आहे. त्यांच्या परवानगीप्रमाणेच या जागेचे खरेदी व्यवहार, नावात बदल केला जाऊ शकतो. या जागेच्या देखभालीची जबाबदारी भाडेतत्वावर २००१ साली कोल्हापूर चर्च कौन्सिलला उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून कोईमारने दिले आहे. या जागेचा मालकी हक्क कोईमारचा असल्याचे प्रतिपत्र योहान इम्यॅनुअल यांनी १-०६-२०११ रोजी निपाणी दिवाणी न्यायालयात दिले आहे. त्यामुळे या जागा विक्रित न्यायालयाची व प्रशासनाची दिशाभूल करत अनेक कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता नसतांनाही स्टिफन सिंगना हाताशी धरून फसवणुकीच्या प्रकाराने विकली आहे. याबाबत धर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांची परवानगी घेतली नाही. जागेबाबत न्यायालयात कायदेशीर खटले सुरू असतांनाही कोईमार ट्रस्टच्या मालकीची जागा विकली आहे. १-०६-२०२३ लाही मालमत्ता हस्तांतरण करण्यास धर्मादाय आयुक्तांनी विरोध केला आहे. याबाबत आम्ही जागा विक्रीच्या प्रकरणात कागदपत्रे सादर करत असतांनाही आमची दाद घेतली नाही.
योग्य कागदपत्रे नसतांनाही प्रॉपर्टी कार्डवरील नावे बदलली आहेत. अलाहाबाद न्यायालयाच्या आदेशाचा गैरवापर केला असून सदर आदेशपत्रांमध्ये १३ बी चा कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही. त्यामुळे तहसिलदारांनी कायदेशीर बाबींची चौकशी करून सदर खरेदी व्यवहाराची चौकशी करून कारवाई करण्याची शिफारस प्रांताधिकाऱ्यांना केली आहे.
यावेळी कोल्हापूर चर्च कौन्सिलनचे दिनानाथ कदम म्हणाले, कोई मारकडून कोल्हापूर चर्च कौन्सिलने
शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य व धार्मिक कार्यासाठी भाडेतत्वावर या जागा घेतल्या आहेत. त्यामुळे या जागेचा युसीएनटीआयचा काही संबंध नाही. त्यामुळे हे सर्व बेकायदेशीर व्यवहार झाले आहेत. येथे असणारी घरे ट्रस्टकडे नोंद आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षकारांना कायदेशीर दस्तऐवज घेऊन समोरासमोर चौकशी करून समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी केली. यावेळी कोल्हापूर चर्च कौन्सिलचे उदय बिजापूरकर, संजय जयकर, रमेश कुरणे यांच्यासह ख्रिश्चन बांधवांची उपस्थिती होती. डेव्हिड तिवडे यांनी स्वागत केले.