Wednesday , March 4 2026
Breaking News

गौरी निर्माल्य संकलनाची ७ वर्षे

Spread the love

 

दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनाचा उपक्रम : यंदा मूर्तीदानाचे आवाहन

निपाणी (वार्ता) : पर्यावरण संवर्धन करण्याच्या समाजिक भावनेतून येथील दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन आणि जायंटस क्लबच्या माध्यमातून फाउंडेशनचे संस्थापक सयोगीत उर्फ निकु पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वमालिकेच्या खनीमध्ये गणेश विसर्जन करण्यासह निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविला. सलग ७ वर्षे फाउंडेशनने हा उपक्रम राबविला असून यंदा फाउंडेशनतर्फे मूर्ती दानाचे आवाहनही करण्यात आले आहे.
दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून निकु पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी निर्माल्य संकलन करून पर्यावरण व पाणी प्रदूषण होणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. शहर व उपनातील सर्वच भाविकांना गणेश विसर्जनासाठी मंडळातर्फे सर्व प्रकारचे सोय केली आहे. तर गौरीच्या निर्माल्य संकलना साठी स्वतःचे ट्रॅक्टर उपलब्ध करण्यात येणार आहे. रात्री उशिरापर्यंत घरगुती गणेश मूर्ती विसर्जन व गौरी निर्माल्यासाठी स्वतंत्र काहील व प्रकाशाची व्यवस्था केली आहे. यावेळी नगरपालिका आणि पोलिस प्रशासनासह फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश भोईटे, निपाणी जायंट क्लबचे अध्यक्ष रणजीत मगदूम, वसंत धारव, पुंडलिक कुंभार, नारायण यादव, सागर पाटील व कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभत आहे.
——————————————————————

‘हरितलवाद न्यायालयाच्या निर्देशासह जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पाण्याच्या मुळ प्रवाहामध्ये गणेश विसर्जन न करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार गेल्या सहा वर्षापासून पर्यावरण व पाणी प्रदूषण टाळण्यासाठी फाउंडेशन नेहमीच कार्यरत राहणार आहे.
-निकु पाटील, संस्थापक, दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन निपाणी

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *