कुर्ली हायस्कूलमध्ये कर्मवीरांना अभिवादन
निपाणी (वार्ता) : कर्मवीर भाऊराव पाटील हे शैक्षणिक क्षेत्रातील रयतेचे तत्वनिष्ठ शिक्षणमहर्षी होते. त्यांचे कार्य हे सर्व जाती-धर्मांसाठी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,महाराजा सयाजीराव, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा वारसा शैक्षणिक क्षेत्रामध्ये भाऊराव पाटील यांनी उभारला. ते सत्यशोधकी होते. त्यांच्याकडूनच सर्वसामान्यांमध्ये निर्भयतेची बीजे पेरली गेली, असे मत प्रा. नानासाहेब जामदार यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी सदस्या सीमा पाटील होत्या.
प्रारंभी पिरलोटे-खेडचे तलाठी दिलीप ढगे यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेच्या मिरवणूकीचे उद्घाटन झाले. विविध वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी कर्मवीरांचा जयघोष करीत मुख्य मार्गावरुन सवाद्य मिरवणूक काढली.
प्रभारी मुख्याध्यापक एस.एस. चौगुले यांनी स्वागत केले.
विद्यालयास देणगी दिल्याबद्दल दिलीप ढगे व कुर्ली ग्रामपंचायत प उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अमोल माळी यांचा सत्कार झाला.
टी. एम. यादव यांनी पारितोषिक वितरण अहवाल वाचन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणप्रेमी लोकांनी ठेवलेल्या विविध तीस पारितोषिकांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण झाले. विद्यार्थ्यांनी कर्मवीरांच्या जीवनाबाबत विचार मांडले.
सीमा पाटील यांनी, कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याचा उहापोह केला.
याप्रसंगी स्कूल कमिटी सदस्य अरुण निकाडे, वकील संजय शिंत्रे, दिलीप ढगे, रामचंद्र निकाडे, आण्णासाहेब पाटील, दिलीप पाटील, कुमार माळी, सीताराम चौगुले, जी. टी. वैराट, बी. एस. पाटील, शिवाजी मगदूम, आप्पासाहेब लोकरे, केरबा वाळवे, विलास पाटील, नानासाहेब पाटील, भरत पाटील, प्रमोद कांबळे, अजित पाटील, शिवाजी पाटील, विश्वनाथ पाटील, संदीप पाटील, सज्जन पाटील, आनंदा ढगे, सदाशिव वाळके उपस्थित होते. एस. ए. पाटील यांनी सूत्रसंचालन तर ए. ए. चौगुले यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta