निपाणी (वार्ता) : पर्यावरण संरक्षण करण्याच्या सामाजिक भावनेतून येथील शहराबाहेरील दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन आणि जायंटस क्लबच्या माध्यमातून फाउंडेशनचे संस्थापक सयोगीत उर्फ निकु पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता.२३) स्वमालिकेच्या खनीमध्ये गणेश विसर्जन करण्यासह निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविला. सलग ७ वर्षे फाउंडेशनने हा उपक्रम राबविला असून यंदा फाउंडेशनतर्फे मूर्ती दानाचे आवाहनही केले होते. त्याला भाविकांचा प्रतिसाद मिळाला.
दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून निकु पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी निर्माल्य संकलन करून पर्यावरण व पाणी प्रदूषण होणार नाही, याची खबरदारी घेतली. शहर व उपनगरातील सर्वच भाविकांना गणेश विसर्जनासाठी मंडळातर्फे सर्व प्रकारचे सोय केली होती. तर गौरीच्या निर्माल्य संकलनासाठी स्वतःचे ट्रॅक्टर उपलब्ध केले होते. रात्री उशिरापर्यंत घरगुती गणेश मूर्ती विसर्जन व गौरी निर्माल्यासाठी स्वतंत्र काहील व प्रकाशाची व्यवस्था केली होती.
हरितलवाद न्यायालयाच्या निर्देशासह जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पाण्याच्या मुळ प्रवाहामध्ये गणेश विसर्जन न करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार गेल्या सहा वर्षापासून पर्यावरण व पाणी प्रदूषण टाळण्यासाठी फाउंडेशनतर्फे कार्य सुरू असल्याचे निकु पाटील यांनी सांगितले.
यावेळी नगरपालिका आणि पोलिस प्रशासनासह फाउंडेशनचे संस्थापक निकु पाटील, अध्यक्ष रमेश भोईटे, निपाणी जायंट क्लबचे अध्यक्ष रणजीत मगदूम, वसंत धारव, पुंडलिक कुंभार, नारायण यादव, सुरेश घाटगे, सागर पाटील, सुभाष शिंदे, शशांक पाटील, शैलेश मल्लाडे, सुनील मल्लाडे, अनिल श्रीखंडे, महादेव बन्ने, छोटू, पावले, विक्रांत पोवार, लोबू पोवार, महादेव मल्लाडे यांच्यासह निकु पाटील मित्र मंडळ आणि मळा ग्रुपच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta