
निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. एस. पाटील हे ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त विद्यालयाच्यावतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक टी. बी. चिखले होते.
मुख्याध्यापक एस. एस. चौगुले यांनी स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बी. एस. पाटील यांचा सपत्नीक सत्कार झाला. केदार मगदूम, संजय शिंत्रे, टी. एम. यादव, रमेश पाटील, एम. एच. बरगाले, नाना पाटील, कुमार माळी, आर. बी. मगदूम, आर. डी. झिंगे यांनी मनोगत व्यक्त केले. विविध शाळा व संस्था तर्फे पाटील यांना गौरविण्यात आले. टी. बी. चिखले यांनी, बी. एस. पाटील यांनी, विद्यार्थी केंद्रबिंदू मानून निष्ठेने सेवा केली. येथून पुढे त्यांनी सामाजिक कार्यासाठी वेळ द्यावा असे आवाहन केले. बी एस पाटील यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी अरुण निकाडे, एस. डी. पाटील, रामचंद्र निकाडे,जी. जी. निकाडे, व्ही. ए. पुजारी, जी. टी. वैराट, जे. एस. झिनगे, जे. एस. वाडकर, रघुनाथ चौगुले, शंकर वैराट, आर. एस. गायकवाड,जे. एस. पाटील यांच्यासह कुर्लीपरिसरातील आजी माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. एस. ए. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ए. ए. चौगुले यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta