
उपाध्यक्षपदी सतीश पाटील; दोन्ही निवडी बिनविरोध
निपाणी (वार्ता) : कर्नाटकानंतर महाराष्ट्र राज्यातही पदार्पण करीत सहकार क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत असलेल्या श्री अरिहंत को- ऑप. क्रेडिट सोसायटी (मल्टीस्टेट) या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल. अध्यक्षपदी संस्थेचे संस्थापक रावसाहेब पाटील व उपाध्यक्षपदी सतीश पाटील (खडकलाट) यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी सहकार संयुक्त निबंधक डॉ. सुरेशगौडा यांनी केली.
संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत निवड झालेल्या संचालकांमध्ये संचालक म्हणूनअभिनंदन उर्फ बच्चू पाटील, सुभाष शेट्टी, अभय करोले, जयपाल नागावे, आप्पासाहेब कडोले, पिरगोंडा पाटील, भुजगोंडा पाटील, शरदकुमार लडगे, बाबासाहेब आपराज, श्रीकांत वसवाडे, अनिता मगदुम, निर्मला बल्लोळे, संदीप पाटील, शिवानंद राजमाने, अजित कांबळे यांचा समावेश आहे.
रावसाहेब पाटील म्हणाले, बिनविरोध निवडणुकीसाठी सहकार्य केलेल्या सर्व सभासदांचा मी ऋणी आहे. गेल्या ३२ वर्षापासून अरिहंत संस्थेने सर्वांच्या विश्वासाला पात्र राहून सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण केले आहे. संस्थेच्या वतीने कर्नाटकात लखनापूर, भिवशी, शिरगुपी, महेशवाडगी, दरूर, एकसंबा, चंदुर, येडूर, सत्ती, बुदिहाळ, कटकोळ, चंदर्गी, यरगट्टी, यरगट्टी, लोकापूर, मुधोळ, रामदुर्ग, कल्लोळी, कोन्नूर, कौजलगी व मुनोळी या ठिकाणी नव्याने शाखा सुरू करणार आहोत. महाराष्ट्र राज्यात कोल्हापूर, जयसिंगपूर, इचलकरंजी, सांगली, वसगडे, नांद्रे, समडोळी, दुधगाव, आष्टा, कुरूंदवाड, अकीवाट, दत्तवाड, अब्दुललाट, हुपरी, कागल, गांधीनगर, गडहिंग्लज व इस्लामपूर या ठिकाणी शाखा प्रारंभ करण्यात येणार आहेत. यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
याप्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व संचालकांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अरिहंतचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील उत्तम पाटील, जनरल मॅनेजर अशोक बंकापुरे, सहाय्यक मॅनेजर शांतिनाथ तेरदाळे, आर. टी. चौगुले, अभिनंदन बेनाडे, प्रकाश जंगटे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta