शरद पै : रोटरी तर्फे राष्ट्रनिर्माता पुरस्कार वितरण
निपाणी (वार्ता) : समाजाच्या प्रगतीमध्ये शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या प्रामाणिक सेवेमुळेच अनेक जण मोठ मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत.देशाच्या जडणघडणीत शिक्षकासह अभियंत्यांचे काम महत्त्वाचे आहे. देशाचे वर्तमान आणि भविष्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे, असे मत रोटरीचे जिल्हा प्रांतपाल शरद पै यांनी व्यक्त केले.
येथील रोटरी क्लबयांच्यावतीने निपाणी परिसरातील शिक्षकांना ‘राष्ट्र निर्माता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोटरी क्लबच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी रोटरी क्लबने यापूर्वी राबवलेले शैक्षणिक व सामाजिक उपक्रम यांचा आढावा घेत भविष्यात शिक्षण क्षेत्रात रोटरी अधिक योगदान देणार असल्याचे पै यांनी सांगितले.
यावेळी प्रदीपकुमार सदलगे, कल्पना रायजाधव, तानाजी पाटील, प्रवीण मोरबाळे, रमेश संकपाळ, वैभव पाटील, विद्यावती पाटील, सुजित संकपाळ, उमेश पाटील, भाऊराव पाटील, शिल्पाताई जगताप, साताप्पा चौगुले, पुनम व्हटकर, रूपाली चावरेकर,किरण कोरे, भुवनेश्वरी अळ्ळीमोरे यांना ‘राष्ट्रनिर्माता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याशिवाय रोटरीचे सदस्य असलेल्या अभियंत्यांचा सत्कारही झाला.
कार्यक्रमास मुख्य प्रांतपाल अशोक नाईक, सहाय्यक प्रांतपाल मकरंद कुलकर्णी रोटरीचे अध्यक्ष प्रवीण तारळे सचिव डॉ. राजेश तिळवे, इव्हेंट चेअरमन प्रमोद जाधव, डॉ. सी. बी. कुरबेट्टी यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते. रोटरीचे माजी अध्यक्ष दिलीप पठाडे यांनी सूत्रसंचालन केले.