‘स्वाभिमानी’चेअध्यक्ष राजू शेट्टींची उपस्थिती
निपाणी (वार्ता) : चिक्कोडी जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना, कर्नाटक राज्य रयत संघटना, स्वाभिनी शेतकरी वाहतूकदार संघटना व हसिरू क्रांती संघटना यांच्या सहकाऱ्याने उसाला मागील गळीत हंगामाचे ४०० रुपये फरक बिल मिळाले पाहिजे. जयसिंगपूर ऊस परिषदेत ठरल्या प्रमाणे यंदाची एफआरपी अधिक मागणी दर मिळालाच पाहिजे. उसाला दर जाहीर केल्या शिवाय कारखान्यांचे धुरांडे पेटू देणार नाही. या मागण्यांसाठी चिक्कोडी, निपाणी भागतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सभा गुरुवारी (ता. ५) बेडकिहाळ येथील बी. एस. संयुक्त पदविपूर्व कॉलेजच्या रत्नाप्पाण्णा भागृहात सायंकाळी ६ वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आल्याची माहिती, शेतकरी संघटनेचे चिक्कोडी जिल्हा कार्याध्यक्ष तात्यासाहेब केस्ते यांनी बेडकिहाळ येथील तारदाळे मळ्यात आयोजित बैठकी प्रसंगी दिली. अध्यक्षस्थानी प्रकाश तारदाळे होते.
तालुकाअध्यक्ष सुभाष चौगुले यांनी स्वागत केले.
तात्यासाहेब केस्ते म्हणाले, गुरुवारी (ता. ५) ऑक्टोबर रोजी आयोजित सभेस स्वाभिमानी संघटनेचे सावकार मदनाईक, राजेंद्र गड्ड्यानावर, राजू पोवार वार वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष संजय राजोबा यांच्यासह कर्नाटक राज्य रयत संघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सध्या शेतकऱ्यांची तोडणी, ऊस वाहतूक, वजनकाटा दरा बाबत कूचंबना केली जात आहे. कारखानदारांचे जाचक धोरण व काटमारी तसेच दुसरीकडे वाहतूदरांची फसवणूक यावर चर्चा करून कायमचा तोडगा काढण्यासाठी सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे या सभेस ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केस्ते यांनी केले. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते राजू खिचडे, प्रवीण शेट्टी यांनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीस रमेश पाटील, पंकज तीप्पन्नावर, तात्यासाहेब बसन्नावर, राकेश पाटील, रमेश मालगावे, विकास समगे, उदय चौगुले, संतोष माने, रमेश मगदूम, प्रशांत पाटील – कोनाप्प, सुरज पडलिहाळे, शीतल पाटील, बाहुबली पाटील, अशोक पाटील( डमडरे), अभय पाटील, संतोष पाटील, युवराज माळी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.