निपाणी(वार्ता) शहरातील पद्मश्री डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने देशव्यापी स्वच्छता हीच सेवा अभियानात सहभाग नोंदविला. प्रतिष्ठानच्या येथील शेकडो स्वयंसेवकांनी शहरातील उद्याने स्वच्छतेची मोहिम राबवित उद्याने चकाचक केली. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यावतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भुषण डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात आली.
येथे स्वच्छता अभियान २० या उपक्रमामध्ये निपाणीतील श्री समर्थ बैठकीमधील सुमारे ७० हून अधिक श्री सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक उद्यान कचरा आणि झुडपांनी वाढले होते. त्याची स्वच्छता करून फूटपाथ रस्ता नव्याने नावारूपास आणला आहे. त्यामुळे सकाळी फिरावयास जाणाऱ्या नागरीकांची सोय झाल्याने नागरीकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळपर्यंत स्वच्छता अभियानपार पडले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रविण भाटले, नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्यासह श्री सदस्यांची उपस्थिती होती. याशिवाय महात्मा गांधी हॉस्पिटल, गटशिक्षणाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.