
उपनिरीक्षिका उमादेवी; ‘इनरव्हील’तर्फे पुरस्कार वितरण
निपाणी (वार्ता) : सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये महिला आघाडीवर अद्यापही महिला समाजाच्या प्रवाहात येण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत न डगमगता स्व सामर्थ्यावर महिलांनी आपली प्रगती साधावी, असे असे आवाहन उपनिरीक्षका उमादेवी गौडा यांनी केले.
येथील इनरव्हील क्लबतर्फे ‘नेशन बिल्डर’ पुरस्कार वितरण सोहळा केएलई कन्नड माध्यम शाळेत पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमात ११ आदर्श शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. बी. एच. परमानट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.
उमादेवी म्हणाल्या, महिलांनी स्वतःला कमी न लेखता स्वताच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून स्वताची वेगळी ओळख निर्माण करावी. समाज आणि देशाच्या हितासाठी काम करावे.
इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा श्रेया खेडेकर यांनी स्वागत केले. चेअरमन सीमा बागेवाडी यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांची माहिती दिली. श्रेयल शहा, स्मिता कुरबेट्टी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. कांचन बिरनाळे यांनी इनरव्हील क्लबच्या कार्याची माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते ११ शिक्षिकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इनरव्हील क्लबचे पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले. अर्चना बुर्जी यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta