
निपाणी (वार्ता) : भारत स्काऊट गाईड कर्नाटक राज्य प्रधान कार्यालय बंगळूर यांच्यातर्फे यंदाचा जिल्हास्तरीय आदर्श स्काऊट गाईडचा शिक्षक पुरस्कार नांगनूर (ता. निपाणी) येथील शाळेतील स्काऊट, गाईडचे शिक्षक टी. बी. लोकरे यांना मिळाला. या पुरस्काराचे वितरण बंगळूर येथील कोंडजी बसप्पा सभागृहात झाले. अध्यक्षस्थानी कर्नाटक राज्य मुख्य आयुक्त पीजीआर सिंधिया तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सिद्धेगौड, डॉ. गो. रू. चन्नबसपा, गुब्बी गोडु रमेश यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. टी. बी. लोकरे यांनी सन २०१४ पासून आजपर्यंत स्काऊट गाईच्या माध्यमातून केलेल्या विविध कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे लोकरे यांचे अभिनंदन होत आहे. के. गंगाप्पागौडर यांनी प्रास्ताविक केले. के. व्ही. शामला यांनी सूत्रसंचालन केले. नागेश यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta