
निपाणी (वार्ता) : गडहिंग्लज येथील ओमकार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय व राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ज. र. तथा दादा पेडणेकर यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांना माजी नगराध्यक्ष शिवाजीराव खणगावे यांच्या हस्ते ज. र. तथा
दादा पेडणेकर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संजीवनी पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. शर्मिला घाटगे यांनी स्वागत केले. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी प्रा. जोशी यांनी पुरस्काराची रक्कम महाविद्यालयाच्या विकासासाठी दिली.
आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी, सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आजच्या राज्यकर्त्यांनी महात्मा गांधींना स्वीकारले परंतू विज्ञानवादी नेहरुंना स्वीकारले नाही. मात्र नेहरुंच्या वैज्ञानिक दृष्टिकोणामुळेच आजची चांद्रयान मोहीम यशस्वी झाली आहे. त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी सुभाष धुमे, डॉ. वृषाली पेडणेकर, आण्णासाहेब देवगोंडा, उद्धव इंगवले, बापू म्हेत्री, सिद्धार्थ बन्ने, सुरेश कोळकी, राधिका पेडणेकर, अरुणा शिंदे बाळासाहेब गुरव, बाबासाहेब पाटील, शशिकला पाटील, शारदा आजरी, बाबुराव ऐवाळे, सुनील शिंत्रे, रविंद्र डोमणे, अनिल उंदरे, दीपा जमदाडे, द्राक्षायणी घुगरे, प्राचार्य आर. एस. निळपणकर उपस्थित होते.भिमराव शिंदे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta