निपाणी (वार्ता) : श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ महासंस्थान, कणेरी, अंतर्गत श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी मार्फत येथे २६ व २७ ऑक्टोबर या दोन दिवशी मोफत सेंद्रिय शेतीबाबत
मेळाव्याचे आयोजन केले आहे.
या सेंद्रिय शेती मेळाव्यासाठी मार्गदर्शक म्हणून सुभाष शर्मा (नैसर्गिक शेती तज्ञ, यवतमाळ), अशोकराव इंगवले (आदर्श खिल्लार गोपालक, सातारा), राजेंद्र वावरे (विशेषज्ञ, मृदा शास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, कणेरी) व सेंद्रिय शेतीतील इतर दिग्गज मार्गदर्शन करणार आहेत.
मेळाव्यासाठी परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी दोन दिवस पूर्ण वेळ उपस्थित राहणार आहेत.
महिला शेतकऱ्यांसाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे.
या सेंद्रिय शेती मेळाव्यासाठी अगोदर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करावा. नाव नोंदणीसाठी पांडुरंग काळे (7350844101), तानाजी निकम (9850935293), राजेंद्र वावरे (9730267038), अश्विनी रावराणे (9404265497) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.