सर्वच स्तरावरुन निर्णयाचे स्वागत : मुलींना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मिळणार संधी
निपाणी (वार्ता) : मुलीच्या लग्नाचे वय 18 वर्षावरून 21 वर्षे करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता कायद्यात दुरुस्ती होणार असून मुलीचे वय 21 वर्षे झाल्याशिवाय लग्न लावणे कायद्याने उल्लंघन होणार आहे. या निर्णयाचे निपाणी तालुक्यातून सर्वच स्तरांतून स्वागत होत असताना दिसून येत आहे.
पूर्वी मुलीचे लग्नाचे वय 18 वर्षे तर मुलाचे वय 21 असणे आवश्यक होते. तरीसुद्धा या कायद्याचे उल्लंघन होताना दिसून येत होते. कमी वयात लग्न होत असल्याने मुलींची उच्च शिक्षण घेऊन स्वत:ला सिद्ध करण्याची इच्छा अपूर्ण राहात होती. परंतु आता मुलीच्या लग्नाचे वय वाढवल्याने स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे उच्च शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणार्या मुलींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
————
शिक्षणाचा डाव अर्ध्यावरच नाही मोडणार
ग्रामीण भागात मुलींचे शिक्षण दहावी, बारावीपर्यंत झाल्यानंतर पालकांकडून मुलीच्या लग्नाची तयारी सुरु केली जाते. अनेक मुलींना आपले शिक्षण अर्धवट सोडून सासरी नादायला जावे लागते. शिक्षणाचे स्वप्न अपुरे सोडून इतर जबाबदाच्या पेलाव्या लागतात. मात्र आता मुलीच्या लग्नाची वय 21 वर्षे ठेवल्याने शिक्षणाचा डाव अर्ध्यावर मोडणार नाही.
———-
ग्रामीण भागातील मुलींना दिलासा
मुलीच्या लग्नाचे वय 18 वर्षावरून 21 वर्षे केल्याने आता त्यांना किमान पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करता येईल. तसेच त्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी सक्षम होऊ शकतील. या निर्णयामुळे मुले-मुली समानता सिद्ध होईल. ग्रामीण भागातील मुलींना या निर्णयाने मोठा दिलासा मिळणार आहे.
————
’वैद्यकीय दृष्टीकोनातून विचार केल्यास हा निर्णय योग्यच आहे. 21 व्या वर्षापर्यंत मुली परिपक्व होत असल्याने त्यांना गर्भधारणा संदर्भात वैद्यकीय अडचणी येण्याची शक्यता कमी असते. तसेच 21व्या वर्षापर्यंत त्यांना किमान पदवीचे शिक्षण पूर्ण करुन स्वत:चे वेगळे विश्व निर्माण करण्याची संधी मिळणार आहे.’
– डॉ. उत्तम पाटील, निपाणी.
————
’21 व्या वर्षापर्यंत मुलीचे पदवीचे शिक्षण पूर्ण होत असते. त्यामुळे ती स्वत:ला सिद्ध करू शकते. 21व्यावर्षी मुलगी परिपक्व होत आहे. त्यामुळे कुटुंबाच्या जबाबदाच्या चांगल्या प्रकारे पेलू शकते. शासनाने घेतलेला हा निर्णय मुलींच्या दृष्टीने अत्यंत चांगला आणि हितकारक आहे.’
– प्रा. कांचन बिरनाळे-पाटील, निपाणी.
Check Also
तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …