
निपाणी (वार्ता) : बेंगळूरच्या अत्तीबेले येथे फटाक्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून मिरवणूक, गणेशोत्सव, विवाह समारंभ आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये फटाके फोडण्यावर निर्बंध घालण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बुधवारी (ता.११) निपाणी मधील फटाके गोदामांची गोदामांची मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील चार गोडाऊनमध्ये फटाक्यांची योग्य त्या सूचना देण्यात आल्या.
मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांनी, दिवाळीत फक्त ग्रीन क्रॅकर्स’ (हिरवे फटाके) वापरण्यास मुभा आहे. त्यामुळे यापुढील काळात हिरव्या फटाके व्यतिरिक्त इतर फटाके उडवल्यास उडविल्यास गुन्हा दाखल होणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. राजकीय कार्यक्रम, मोठ्या फटाक्यांच्या दुकानांना परवानगी देताना यापुढे अग्निशमन दल, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांकडून सदर ठिकाणाची पाहणी होणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेला तपासणी अहवाल योग्य आहे का, याची पडताळणी करूनच निर्णय घेतला जाणार आहे. अधिकाऱ्यांनी सर्वत्र तपासणी करून सुरक्षा उपाययोजना न केलेल्या गोदाम, दुकानांवर कारवाई करावी, अशी सूचना आली आहे. त्यानुसार सर्व दुकानांची चौकशी करण्यात येत आहे. शिवाय प्रत्येक दुकानदारांना याबाबतची कल्पना दिल्याचे सांगितले. यावेळी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार, ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक व पोलिसांनी या तपासणी मोहिमेमध्ये सहभाग घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta