
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील तहसीलदार कार्यालयातील ग्रेड-टू तहसीलदार प्रवीण कारंडे यांची बेंगळूर येथील महसूल मुख्यालयात बदली झाली आहे. त्यांच्या जागी अरुण श्रीखंडे यांची नियुक्ती झाली असून लवकरच ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
कारंडे हे मूळचे निपाणीचे असून त्यांची महसूल भागात २३ वर्षे सेवा झाली आहे. २०१९ मध्ये त्यांनी ग्रेड-टू तहसीलदार म्हणून काम केले होते. तसेच तात्कालीन तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांच्या बदलीनंतर सात महिने त्यांनी ग्रेड- १ तहसीलदार म्हणून काम केले आहे. त्याशिवाय ९ वर्षे चिकोडीत उपतहसीलदार म्हणून, ३ वर्षे प्रादेशिक आयुक्त कार्यालय बेळगाव येथे काम केले आहे.
नव्याने रुजू होणारे अरुण श्रीखंडे हे मूळचे चिकोडीचे असून त्यांची महसूल विभागात २२ वर्षे सेवा झाली आहे. यापूर्वी त्यांनी चिकोडी व निपाणी येथे शिरस्तेदार म्हणून काम केले आहे. तसेच अण्णिकेरी जि. धारवाड येथे ते ग्रेट-टू तहसीलदार म्हणून काम करत होते. त्या ठिकाणी त्यांनी ग्रेट- १ तहसीलदार म्हणूनही काही काळ काम केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta