
निपाणी (वार्ता) : बेंगळूरजवळ फटाक्याच्या दुकानाला लागलेल्या आगीची सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून मिरवणूक, गणेशोत्सव, विवाह समारंभ आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये फटाके फोडण्यावर निर्बंध घालण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शुक्रवारी (ता.१३) शहरातील फटाके विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात आली. मंडल पोलीस निरीक्षक विश्वनाथ चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अनेक किरण दुकाने व गोडाऊनमध्ये तपासणी करून विक्रेत्यांना विविध सूचना दिल्या.
चिकोडीचे सीपीआय विश्वनाथ चौगुला म्हणाले, दिवाळीत फक्त ग्रीन क्रॅकर्स वापरण्यास परवानगी आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. राजकीय कार्यक्रम, मोठ्या फटाक्यांच्या दुकानांना परवानगी देताना यापुढे अग्निशमन दल, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखां कडून सदर ठिकाणाची पाहणी होणार आहे. अधिकाऱ्यांनी सर्वत्र तपासणी करून सुरक्षा उपाययोजना न केलेल्या गोदाम, दुकानांवर कारवाई करावी, अशी सूचना आली आहे. त्यानुसार सर्व दुकानांची चौकशी करण्यात येत आहे. यावेळी सदलगा ठाण्याचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार व पोलिसांनी या तपासणी मोहिमेमध्ये सहभाग घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta