निपाणी (वार्ता) : रक्तदान हे श्रेष्ठदान असून मानवी जीवनाला रक्त शिवाय पर्याय नाही. अलीकडच्या काळात अपघात, विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि इतर रुग्णांना रक्ताची टंचाई भासत आहे. त्यामुळे सामाजिक संस्था आणि युवक मंडळांनी रक्तदान शिबिरे भरून रक्ताची गरज भागवणे आवश्यक आहे. त्यासाठी निपाणी रोटरी क्लब कार्यरत असून नागरिकांच्या बरोबरच महिलांनीही आता रक्तदानासाठी पुढे यावे, अशा अवाहन शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिक उमादेवी यांनी केले. येथील रोटरी क्लबमध्ये रक्तदान करून त्या बोलत होत्या.
रक्तदानाबद्दल रोटरी क्लबतर्फे सेक्रेटरी राजेश तिळवे यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण उर्फ विरु तारळे यांनी, निपाणी रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध प्रकारचे शिबिरे भरून समाजातील गरजूंना आधार दिला जात आहे. सध्या मानवी रक्ताची गरज वाढली असून ती भागविण्याचे काम रोटरी क्लब करत आहे. त्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचे आवाहन केले. यावेळी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष दिलीप पठाडे, श्रीकांत कासुटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.