
प्रफुल्ल भाई; समाधी मठ गो शाळेचे लोकार्पण
निपाणी (वार्ता) : पुरातन काळापासून गाईचे महत्व अधोरेखित झाले आहे. कमी होत असलेली देशी गाईंची संख्या चिंतणीय आहे. अशा परिस्थितीमध्ये वीरूपाक्षलिंग समाधी मठात गाई संगोपन उपक्रम स्तुती आहे. देशी गाईपासून मानवी जीवनाला अनेक फायदे असल्यानेआजच्या युगात गोमाता संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे मत मुंबई येथील अदि जीन युवा चॅरिटेबल ट्रस्टचे प्रफुल्ल भाई यांनी व्यक्त केले. येथील चिकोडी रोडवरील वीरूपाक्षलिंग समाधी मठातील गो शाळेचे लोकार्पण करण्यात आले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
श्रीविरूपाक्षलिंग समाधी मठ गोशाळा येथे चारा गोडाऊनचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तमनाकवाडा येथील
श्री दत्तपीठाचे परमपूज्य सद्गुरु सच्चिदानंद बाबा हे उपस्थित होते. प्राणलिंग महास्वामींच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी हॉटेल उद्योजक अमरजीत पाटील यांच्यासह विरूपाक्षलिंग समाधी मठाचे ट्रस्टी भक्तमंडळी गोसेवक, गोपालक, गोभक्त आणि गोरक्षक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta