निपाणी (वार्ता) : हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील हजरत पिराने पीर उरूस गुरुवारी (ता.२६) होणार आहे. याच दिवशी चाटे मार्केट, अशोक नगर, नरवीर तानाजी चौक, कोठेवाले कॉर्नरसह परिसरात आठवडी बाजार भरतो. त्यामुळे उरुसात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार आहे. याशिवाय दुचाकी आणि चार चाकी वाहनांना ये -जा करणे कठीण होणार आहे. त्यामुळे गुरुवारी भरणारा आठवडी बाजार नेहमीच्या ठिकाणी न भरवता येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या पटांगणावर भरवण्याची मागणी निपाणी शहर रिक्षा असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. याबाबत नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांना असोसिएशनचे अध्यक्ष संजय तिप्पे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
येथील हजरत पिराने पीर उरूस, दसरा आणि आठवडी बाजार एकाच दिवशी आहे. त्यामुळे उसासाठी येणाऱ्या भाविकांना रस्ता मिळणे कठीण होणार आहे. याशिवाय रिक्षा अथवा अन्य वाहनातून रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवणे अशक्य आहे. परिणामी परिणामी रुग्णासह नागरिकांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने आतापासूनच आठवडी बाजार म्युनिसिपल हायस्कूलच्या पटांगणावर भरवण्याची तयारी करावी. शिवाय याबाबतची जनजागृती करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर निवेदनावर असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय आंबुसकर, सेक्रेटरी प्रवीण पोवार, खजिनदार संदीप सावंत यांची नावे आहेत.