
निपाणी (वार्ता) : कोल्हापूर येथील ५६ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. तर्फे एन.सी.सी. भवनात दहा दिवसांचे सामाईक वार्षिक प्रशिक्षण शिबीर पार पडले. यामध्ये एकूण ४५० छात्र सहभागी झाले होते.या शिबीरात देवचंद कॉलेजच्या १७ मुली ३६ मुले असे एकूण ५३ छात्र सहभागी झाले होते.छात्रांकरीता फायरिंग, ड्रील, क्राॅसकंट्री, टग ऑफ वाॅर स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये देवचंद कॉलेजच्या छात्रांनी यश प्राप्त केले.
शिबीरात लष्करी प्रशिक्षणाबरोबरच नकाशावाचन, कवायत, शारीरिक तंदुरुस्ती, खेळ, फायरिंग, सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रशिक्षण देण्यात आले.
मुलांच्या वश विभागात ड्रिल स्पर्धेत एस.यु.ओ. ओंकार खोत, जे.यु.ओ. प्रसाद मगदूम, ड्रील स्पर्धेत मुलींचे विभागात तेजश्री कमते, क्राॅसकंट्री स्पर्धेत मुलांचे विभागात विशाल भोसले, मुलींच्या विभागात शुभांगी सावंत, नम्रता शेवाळे यांनी यश मिळवले.फायरिंग स्पर्धेत मुलांच्या गटात श्रेयश चव्हाण, सुशांत खोत यांनी यश मिळवले. यशस्वी छात्रांना ५६ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. कमांडिंग ऑफिसर कर्नल पुनीत गोगीआ, सुभेदार मेजर रवळू बोकडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
विजेत्या छात्रांचे संस्थेचे अध्यक्ष आशीषभाई शाह, उपाध्यक्षा तृप्तीभाभी शाह, खजिनदार सुबोधभाई शाह, प्राचार्या डाॅ. जी. डी. इंगळे, उपप्राचार्य ए. डी. पवार, पर्यवेक्षीका एस. पी. जाधव, मेजर डाॅ. अशोक डोनर यांनी कौतुक केले.
Belgaum Varta Belgaum Varta