निपाणीत चैतन्याचे वातावरण
निपाणी (वार्ता) : पांढरी शुभ्र कपडे, डोक्यावर भगवे फेटे आणि टोप्या, हाती भगवे ध्वज आणि तलवारी घेतलेल्या धारकऱ्यांसह शहर परिसरातील शेकडो युवक- युवती दौडमध्ये सहभागी होत आहेत.
पाचव्या दिवशी बुधवारी (ता.१८) काढलेल्या दुर्गामाता दौडीतून देव, देश, धर्माचा जागर पहावयास मिळाला.
प्रथमता: मध्यवर्ती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज मूर्तिचे पूजन रुपाली भोसले, सपना भांभुरे, रेखा पन्हाळकर व ध्वज आणि शस्त्र पूजन विभावरी भांभुरे, गीता पन्हाळकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ध्येय मंत्र सादर करून श्री. दुर्गा माता दौड सुरवात झाली. ही दौड श्रीमंत सिध्दोजीराजे निपाणकर राजवाड्याकडे मार्गस्थ झाली. वाड्यातील आदिशक्ती जगदंबेची आरती करून छत्रपती शिवाजी नगर पहिली गल्ली, दुसरी गल्ली चौथी गल्ली, सहावी गल्ली, संत रोहिदास नगर, विवेकानंद कॉलनी येथे पोहोचली. यावेळी परिसरातील भाविकांनी स्वागत केले. छत्रपती शिवाजीनगर परिसर शिव जयघोषाने दुमदूमला होता. बालचमुसह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
अनेक भागात दौडीमधील धारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. दौडच्या मार्गावर सुहासिनींनी धारकऱ्यांचे औक्षण करून दौडीचे स्वागत केले. दुर्गादेवी व धर्म रक्षणाच्या स्फूर्ती गीतांनी वातावरण चैतन्यमय झाले होते. विविध ठिकाणी शिवराय व अन्य देवतांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. दौडच्या मार्गावर रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या.
यावेळी अभिजित शिंदे, राहुल डवरी, नरेश मोडीकर, सागर मातीवड्डर, आकाश पोवार, श्री रणदिवे, पवन घोटणे, रोहित गुरव, प्रवीण रणदिवे, स्वप्नील पाटील, निरंजन घोडके, सतीश हसुरे, अमित चव्हाण, शुभम हसूरे, अनिकेत भोपळे, प्रसाद घोडके, गौरव नलवडे व मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते व शिवप्रेमी उपस्थित होते.