
जयसिंगपूर शाखेचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : सहकार महर्षी रावसाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या बोरगाव श्री अरिहंत को-ऑप. क्रेडिट सोसायटीने सहकार क्षेत्राबरोबरच समाजाभिमुख कामांना प्राधान्य दिले. विश्वास, पारदर्शकता, प्रामाणिकतेला विशेष महत्त्व देऊन कर्नाटक राज्यात नावलौकिक मिळवला आहे. आता संस्थेने जयसिंगपूर शाखेच्या माध्यमातून महाराष्ट्रात पदार्पण केले आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र आणखीन बळकट होईल असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला. बोरगाव येथील अरिहंत संस्थेच्या जयसिंगपूर येथील शाखेचे उद्घाटन स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामींच्या दिव्य सानिध्यात उद्घाटन करून ते बोलत होते.
स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामी यांच्या हस्ते पूजन, उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व उद्योगपती रणजीत कुलकर्णी यांच्या हस्ते लॉकरचे उद्घाटन झाले.
उत्तम पाटील यांनी, विश्वासामुळेच सहकार क्षेत्राची प्रगती होते. हाच विश्वास अरिहंत संस्थेने गेल्या ३३ वर्षात जपला आहे. जयसिंगपूर व परिसरातील उद्योग व्यवसायांना चालना देत जयसिंगपूर नगरीच्या अर्थव्यवस्थेत भर पडण्याच्या उद्देशाने शाखा सुरू केल्याचे सांगितले.
कार्यक्रमास संस्थापक रावसाहेब पाटील, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील -यड्रावकर, शिरोळ नगरपंचायतचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, पृथ्वीराज पाटील, विनोद घोडावत, राजेंद्र नांद्रेकर, दादा पाटील चिंचवडकर, राजू झेले, घोडावत कॉलेजचे विश्वस्त विनायक भोसले, डॉ. जे.जे. मगदूम कॉलेजचे अध्यक्ष विजयराज मगदुम, सी. बी. पाटील, प्रकाश झेले, संजय नांदने, दिलीप पाटील, विनोद चोरडिया, द.भा.जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील, राजकुमार खवाटे, सीईओ अशोक बंकापुरे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. शाखा अधिकारी शांतिनाथ तेरदाळे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta