निपाणी (वार्ता) : श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांच्या राजवाड्यामध्ये नवरात्र उत्सवाच्या पाचव्या दिवशी ललित पंचमी निमित्त कुंकुमार्चनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शहरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पाचव्या दिवशी आई तुळजाभवानीचे रूप आमराईमध्ये चोपड्यावर खेळत असलेले रूप दाखवले होते. श्रीमंत दादाराजे निपाणकर व श्रीमंत सम्राज्य लक्ष्मीराजे निपाणकर यांच्या हस्ते कवळ पूजन करण्यात आले. पांडुरंग वडेर महाराजांनी या कार्यक्रमाचे पौरोहित्य केले होते. कार्यक्रमास श्रीमंत राजकुमारराजे पाटणकर, श्रीमंत सुकीर्तीराजे निपाणकर, श्रीमंत राजेश्वरीराजे निपाणकर, श्रीमंत सोनालीराजे निपाणकर, श्रीमंत दिव्यलक्ष्मीराजे निपाणकर, राजकुमारी श्रीमंत ऋतंबरा राजे निपाणकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुजित गायकवाड, प्रमोद पुजारी, प्रसाद पुजारी, स्वरूप पुजारी, संतोष स्वामी यांनी परिश्रम घेतले.