ग्रामस्थांचे निवेदन : आंदोलनचा इशारा
कोगनोळी : येथील प्रभाग क्रमांक 1 मधील लक्ष्मी नगर येथे धुणे धुण्याची पावडर व साबण कारखाना आहे. कारखान्यामुळे येथील नागरिकांना त्रास होत आहे. यासाठी कारखाना बंद करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला दिले आहे.
सदर निवेदनाची दखल न घेतल्यास ग्रामपंचायत समोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले.
या निवेदनात लक्ष्मी नगर येथे निरमा पावडर व साबण तयार करण्याचा कारखाना आहे. कारखान्यामधून विषारी हवा व धूळ व त्यामधून येणारे पाणी हे दूषित असून दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे. ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कारखान्याच्या मालकाला तोंडी समज देऊन देखील त्यांनी दखल घेतलेली नाही. यासाठी ग्रामपंचायतीला निवेदन देऊन सदर कारखान्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. कारवाई न झाल्यास ग्रामपंचायतीसमोर आंदोलन करण्यात येणार आहे.
यावेळी संतोष माने, अरबाज नाईकवाडे, सुनील मगदूम, इरफान नाईकवाडे, अजय नवाळे, राशीद नाईकवाडे, शकूर करनूरे, प्रकाश पवार, सुभाष माने, आप्पासो माने, गुंडू माने, भीमराव माने, संतोष दरी, संदीप माने, आनंदा माने, रावसाहेब माने यांच्यासह अन्य ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.