Monday , December 8 2025
Breaking News

बेळगाव, रेंदाळ संघ नितीन शिंदे चषकाचे मानकरी

Spread the love

 

‘धनलक्ष्मी’तर्फे क्रिकेट स्पर्धा, ४६ संघांचा सहभाग

निपाणी (वार्ता) : येथील टॉप स्टार स्पोर्टस् क्लबच्या सहकार्याने धनलक्ष्मी संस्थेतर्फे नितीन शिंदे यांच्या स्मरणार्थ येथील म्युनिसीपल हायस्कूलच्या मैदानावर नितीन शिंदे चषक-२०२३, ग्रामीण व शहरी क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये शहरी विभागात बेळगाव येथील के. आर. शेट्टी तर ग्रामीण विभागात रेंदाळ स्पोर्ट्स क्लबने विजेतेपद पटकावून प्रत्येकी ५० हजार रुपयांचे बक्षीस आणि चषक मिळविले. विजेत्या संघांना शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेत कर्नाटक आणि महाराष्ट्रातील ४६ संघांनी सहभाग घेतला होता.
शहरी विभागात इचलकरंजीच्या रणजीत दादा स्पोर्ट्स क्लब तर ग्रामीण भागात कुडची स्पोर्ट्स क्लबने उपविजेचे पद पटकावले. त्यांना प्रत्येकी २५ हजाराची बक्षिसे व चषक देऊन गौरवण्यात आले. याशिवाय मॅन ऑफ दी सेरीज, अंतिम सामन्यातील सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली. उपनिरीक्षिक उमादेवी यांनी, सदृढ मन आणि शरीरासाठी खेळ आवश्यक आहेत. त्यासाठी युवकांनी व्यसनापासून दूर राहून खेळाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. उदय पवार यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल व सदलगा येथील नगरपंचायतीमध्ये प्रभारी चिफ ऑफिसर म्हणून निवड झाल्याने लहू मधाळे यांचा सत्कार झाला.
स्पर्धेचे पंच म्हणून महेश बुवा, जावेद कोल्हापुरे यांनी तर बाळू आत्तार, उदय पवार, जुबेर बागवान यांनी सामन्याचे समालोचन केले.
कार्यक्रमास सुनिता शिंदे, धनश्री शिंदे, सोमनाथ शिंदे, ओंकार शिंदे, विलास साळुंखे, सुनील काळगे, आकाश खवरे, तुषार शिंदे, रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला, विनायक फुटाणकर, फैयाज बागवान, अनिल भोसले, बबलू मांगोरे, दिलीप घाटगे, गणेश गायकवाड, विकास चव्हाण, विजय कदम, जावेद बागवान, राजू नाईक, फिरोज मुल्ला यांच्यासह टॉप स्टार क्लबचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. नितीन साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले.

About Belgaum Varta

Check Also

इचलकरंजी येथील युवकाचा निपाणी जवळ खून

Spread the love  धारदार शस्त्राचा वापर ; मृतदेह टाकला ओढ्यात निपाणी (वार्ता) : इचलकरंजी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *