
युवा नेते उत्तम पाटील : अरिहंत शुगर्सचा सहावा गळीत हंगाम प्रारंभ
निपाणी (वार्ता) : जैनापुर (ता. चिक्कोडी) येथील अरिहंत शुगरचा यंदाच्या वर्षातील गळीत हंगामाचा चार लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून या भागातील इतर कारखान्याबरोबर शेतकऱ्यांना दर देणार असल्याची माहिती युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली. ते कारखान्याच्या सहाव्या गळीत हंगामाचा प्रारंभ करून बोलत होते. यावेळी सहकाररत्न रावसाहेब पाटील, कारखाण्याचे अध्यक्ष अभिनंदन पाटील व मान्यवरांची प्रमुख उपस्थित होती.
पाटील पुढे म्हणाले, यंदा पावसाच्या कमतरतेमुळे ऊस उत्पादनात घट झाली आहे. अरिहंत परिवाराचे सर्व सदस्य, शेतकरी बांधव, ऊस उत्पादक, कारखान्याचे सर्व खात्याचे पदाधिकारी यांनी आमच्यावर ठेवलेला विश्वासामुळे प्रत्येकवर्षी सहकार्य मिळाले आहे. मागील वर्षी एफआरपी ३६०० प्रमाणे २८५१ दर दिला होता. यंदाही इतर कारखान्या बरोबर योग्य दर देणार आहे. गेली सहा वर्षे शेतकरी बांधव आमच्या सोबत असून त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. सध्या इथेलॉनचे कामही अंतिम टप्प्यात आले असल्याने लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. कमी पावसामुळे ऊस वाढीच्या घटीमुळे केवळ शंभर दिवसांपर्यंत कारखाना चालण्याची शक्यता असून सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी अभिनंदन उर्फ बच्चू पाटील, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, मीनाक्षी पाटील, विनयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, युवराज पाटील, धनश्री पाटील, राजीव चौगुला, निरंजन पाटील, दिग्विजय पाटील, सागर चौगुला, कारखान्याचे सीईओ आर. के. शेट्टी, शेती अधिकारी सुभाष चौगुले, आर. टी. चौगुला, अरिहंत संस्थेचे सीईओ अशोक बंकापुरे, प्रकाश पाटील, गजानन कावडकर, पंडित हरेल यांच्यासह, चिक्कोडी, निपाणी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta