
आमराई रेणुका मंदिरांत गर्दी; शमीपूजनासह विविध धार्मिक कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : निपाणीसह परिसरात मंगळवारी (ता. २४) विजयादशमी पारंपरिक पद्धतीने झाली. त्यानिमित्त शमीपूजनासह विविध धार्मिक कार्यक्रम झाले. येथे सायंकाळी ६ वाजता सासणे कुटुंबीयातर्फे महादेवाची तर निपाणकर राजवाड्यातून सिद्धोजीराजेंची पालखी बेळगाव नाका येथील आमराई रेणुका मंदिरात आणली. तेथून चव्हाणमळा येथे श्रीमंत दादाराजे देसाई यांच्या हस्ते शमीच्या पानांचे पूजन झाले. ७ वाजता आमराई परिसरातील रेणुकादेवीचे दर्शन घेतल्यानंतर सोने लुटण्यात आले.
यावेळी दादाराजे यांची ओवाळणी होऊन धार्मिक कार्यक्रम झाले. तेथून पालखी पुन्हा निपाणकर राजवाड्यात आणली. बळीच्या पोटातील अंगठी काढून देवीची आरती झाली. रात्री ममदापूर येथील गोंधळ्यांचा कार्यक्रम झाला.

यावेळी विजयराजे, शरदराजे, राजेशराजे, युवराज सिद्धोजीराजे, लक्ष्मणराजे, धनदीपराजे, वृषभसेनराजे, शिवतेजराजे निपाणकर देसाई सरकार, आनंदराव सोलापूरकर, सुधाकर भोईटे, सुरेश पवार, उत्तम जामदार, विश्वासराव पाटील, विजयसिंह सासणे, हेमंत सासणे, जयवंत सासणे, सर्जेराव देसाई, युवराज पाटील, संजय पारळे, सुजित गायकवाड, अमोलसिंह भोसले, सदाशिव डवरी, प्रमोद पुजारी, प्रसाद पुजारी, संतोष पुजारी, धर्मराज कमते नवीन कमते, अरविंद कमते, बंडू कमते, सुरेश कमते, शिवाजी भोई, गजानन भोई, पांडुरंग भोई, शंभू भोई यांच्यासह मानकरी उपस्थित होते.
येथील लिंगायत समाजातर्फे व्हीएसएम संस्थेच्या पटांगणात सीमोल्लंघन झाले. तुषार खंदारे यांनी सवाल घेऊन शमीपूजन केले. गंगाधर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास विद्या संवर्धक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, पुष्कर तारळे, गजेंद्र तारळे, माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, वीरू तारळे, संजय मोळवाडे, अनिल नेष्टी, राजेश पाटील, वज्रकांत सदलगे, सदानंद दुमाले, प्रकाश बाडकर, सुनील नेजे, डॉ. एस. आर. पाटील, श्रीनिवास संकपाळ, डॉ. महादेव भोस्की, गणेश पट्टणशेट्टी, रवींद्र कोठीवाले, शिवकांत चंद्रकुडे, विजय मेत्राणी, लक्ष्मण ठगरे, मल्लिकार्जुन गडकरी, महालिंगेश, कोठीवाले, अनिल शांडगे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
येथील खाटीक समाजातर्फे बिरदेव मंदिराजवळ सोने लुटण्याचा कार्यक्रम झाला. प्रगतीनगरातील महादेव मंदिरासमोरही पालखी मिरवणुकीनंतर सीमोल्लंघनाचा कार्यक्रम झाला.
Belgaum Varta Belgaum Varta