
आशिष भाट; निपाणीत दौडीची सांगता
निपाणी (वार्ता) : दुर्गा माता दौडीतून सध्याच्या तरुण पिढीला एक चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. दौडीच्या काळात तरुण पिढीवर धर्मसंस्कार करण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची ओळख झाली आहे. यापुढील काळात युवकांनी अशा थोर व्यक्तींचे विचार डोळ्यासमोर ठेवून समाजासाठी काम करावे, असे आवाहन मंडळाचे कार्यकर्ते आशिष भाट यांनी केले.
येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे नवरात्र उत्सवानिमित्त अखंड अकरा दिवस श्री दुर्गामाता दौड काढण्यात आली. त्याच्या सांगता समारंभ प्रसंगी भाट बोलत होते.
प्रथम छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीला गोदावरी, यमुना, पंचगंगा, दूधगंगा, कृष्णा, हिरण्यकेशी, वेदगंगा या सप्त नद्याच्या पाण्याचा महाभिषेक घालून ध्येय मंत्राने श्री दुर्गामाता दौडला सुरवात करण्यात आली. तिथून श्री दुर्गामाता दौड निपाणकर वाड्याकडे मार्गस्थ झाली. निपाणकर वाड्यातील आदिशक्ती श्री जगदंबेची आरती करून श्री दुर्गामाता दौड चाटे मार्केटकडे मार्गस्थ झाली.
शिवराष्ट्र धर्म संगटनेतर्फे स्वागत करण्यात आले. तिथून श्री दुर्गामाता दौड जुना पी. बी. रोड मार्गे कोठीवाले कॉर्नरकडे मार्गस्थ झाली. या ठिकाणी स्ट्रब्लर्सग्रुपतर्फे स्वागत करण्यात अले. यावेळी सिने अभिनेत्री अंकिता निकाडे यांची उपस्थिती लाभली. तिथून श्री दुर्गामाता दौड दत्त गल्ली, जिजामाता चौक, कोरवी गल्ली, घिसाड गल्लीकडे मार्गस्थ झाली. संपूर्ण परिसर शिव शंभोच्या जय घोषणे दुमदूमला होता. सर्वत्र फुलांचा वर्षाव करून श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत करण्यात आले. श्री दुर्गामाता दौड छत्रपती शिवाजी महाराज चौककडे मार्गस्थ झाली. येथे प्रेरणा मंत्राने दौडची सांगता करण्यात आली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब जासूद, उपाध्यक्ष संजय माने, खजिनदार नितीन साळुंखे, सेक्रेटरी ओमकार शिंदे, संचालक पांडुरंग भोई, महेश कांबळे, वर्षा वरुटे, सेजल माळी, ऋतुजा सावंत, प्रेरणा पोटजाळे, श्वेता शिंदे, ऋतुजा मालबा, सानिका निर्मळे, साक्षी अब्दगीरे, सई भोई, शर्वरी घोडके, स्नेहल कांबळे, तन्वी भिसे, साक्षी तोडकर, सलोनी घोरपडे, सोनाली परीट, आकांक्षा चव्हाण, स्नेहल नवाळे, निर्जला पाटील, सृष्टी गायकवाड यांच्यासह मध्यवर्ती श्री शिवाजी तरुण मंडळाचे कार्यकर्ते व शिव प्रेमी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta