निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठांतर्गत आंतरविभागीय तायक्वांदो स्पर्धा झाल्या. मुलांमध्ये ६० स्पर्धकांनी सहभाग घेतला. विजयी खेळाडूंना महाविद्यालया मार्फत मेडल्स व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. मुलांच्या व मुलींच्या विभागात सर्वाधिक गुण मिळवून देवचंद महाविद्यालयाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंचप्रमुख पद्माकर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सुरज कुंभार, शितल शिंत्रे, अमीर मुल्लानी, राजू जाधव, उदय माळी, अक्षय खेतमर, अक्षय पवार यांनी परिश्रम घेतले.
पात्रता कमिटीमध्ये प्रा. डॉ. श्रीनिवास पाटील, प्रा. राहुल लहाने, तांत्रिक समितीमध्ये प्रा. डॉ. धनंजय पाटील, पद्माकर कांबळे, सुरज कुंभार यांनी काम पाहिले. शिवाजी विद्यापीठाचे निवड समितीचे अध्यक्ष डॉ. विनायक भागवत, सदस्य प्रा. गौरव चव्हाण प्रा. शिल्पा शिरोटे व स्पर्धा निरीक्षक प्रा.अनिता व्हटकर यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी देवचंद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे, प्रा. डॉ. रवींद्र चव्हाण, संतोष वागळे, वैभव सोनार, आनंद घोळवे यांनी परिश्रम घेतले. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिष शहा, उपाध्यक्षा डॉ. तृप्ती शहा, खजिनदार सुबोध शहा यांचे मार्गदर्शन लाभले.