Monday , December 8 2025
Breaking News

निपाणी उरूसाचा शुक्रवारी मुख्य दिवस

Spread the love

 

नैवेद्यासह विविध शर्यती; पहाटे चव्हाण वाड्यातील गलेफ

निपाणी (वार्ता) : असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब यांच्या उरूसाला गुरुवारी (ता.२६) प्रारंभ झाला. उरूसानिमित्त चव्हाण घराण्याकडून दर्ग्यात चुना चढविण्याचा विधी करण्यात आला.कर्नाटक महाराष्ट्रातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता.२६) बेडीवाल्यांचा उरूस साजरा झाला.
गुरुवारी (२६) गंधरात्र निमित्त चव्हाण वाड्यातून मिरवणुकीने गंध घेण्यात आला. रात्री जिजामाता चौकातील चव्हाण वाडा येथे आतष बाजी करण्यात आली.
शुक्रवारी (ता.२७) भर उरूस होणार आहे. त्यानिमित्त चव्हाण वारसांतर्फे दर्गाह तुरबतीला गलेफ चढवला जाणार आहे. शुक्रवारी (ता.२७) सकाळी नऊ वाजता अंमलझरी रोडवरील आंबेडकर नगर येथे विविध शर्यतीचे आयोजन केले आहे. खुल्या गावगन्ना विना लाठी काठी बैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे ७००१, ५००१ आणि ३००१ रुपये, घोडा गाडी शरकीसाठी अनुक्रमे ३००१, २००१ आणि १००१ रुपये आणि गाडी मागून श्वान पळविण्याच्या स्पर्धेसाठी अनुक्रमे १००१, ७०१, ५०१ रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. रात्री ९.३० वाजता मिरज येथील रेश्मा ताज कव्वाल पार्टी आणि इचलकरंजी येथील सरदार ताज कव्वाल पार्टी यांच्यात कव्वालीचा जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे.
शनिवारी (ता.२८) शिळा उरूस आहे. चव्हाण वाडा येथे खारीक व उदींचा कार्यक्रम,मानाचे फकीर रवानगी व भंडारखाना कार्यक्रम होणार आहे. तर दुपारी तीन वाजता म्युनिसिपल हायस्कूल जवळील श्री संत बाबा महाराज चव्हाण कुस्ती मैदानात विविध गटातील कुस्त्या होणार आहेत.
रविवारी (ता.३१) पाकळणीचा कार्यक्रम होऊन उरुसाची सांगता होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव पट्टणपंचायतीच्या निधीतून आयको परिसरात पाणी योजनेचे उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव उपनगर असलेल्या आयको येथील मल्लिकार्जुन नगरमधील नागरिकांना अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *