Tuesday , March 3 2026
Breaking News

युवकांनी समाज परिवर्तनाची जबाबदारी घ्यावी

Spread the love

 

दंगलकार नितीन चंदनशिवे; पडलिहाळमध्ये धम्मचक्र परिवर्तन दिन

निपाणी (वार्ता) : देशात सध्या सर्वत्र नकलीपणाचे प्रमाण वाढले आहे. समाजातील नकली पुढार्‍यांच्यापासून तरुण पिढीने सावध राहिले पाहिजे. पदाची हाव असणाऱ्यामध्ये प्रगती दिसत नाही. प्रामाणिक कार्यकर्ते हे पदासाठी नाहीतर समाज बदलासाठी प्रयत्नशील असतात. समाजातील सुशिक्षित युवकांनी समाज परिवर्तनाची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन दंगलकार विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांनी केले.

पडलीहाळ येथे ‘ज्योत प्रबोधनाची गरज काळाची’ एक दृढ संकल्प हे आठवे पुष्प गुंफताना धम्मचक्र परिवर्तन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
रमा मुरलीधर यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. कपिल कांबळे यांनी बौद्ध वंदना सांगितली. संजय कांबळे यांनी स्वागत तर प्रशांत कांबळे यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन झाले.
चंदनशिवे म्हणाले, युवकांनी दिशाभूल करणाऱ्या नेत्यांना वेळीच ओळखून समाजात तेढ निर्माण होऊ नये, याची काळजी तरुणांनी घेतली पाहिजे. चर
तुमच्यातील बदलाची चर्चा झाली पाहिजे. बाबासाहेबांना रंग, स्टेटस यापुरते मर्यादित न ठेवता युवकांच्या कर्तृत्वातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिसले पाहिजेत. प्रा. एस. के. कांबळे, डॉ. आंबेडकर विचार मंचचे संस्थापक प्रा. सुरेश कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास किरण मेस्त्री, माजी ग्रामपंचायत सदस्या माधुरी कांबळे, सुनील कांबळे यांच्यासह महिला, युवक, संयुक्त आंबेडकरनगरचे कार्यकर्ते उपस्थित होते. अस्मिता कांबळे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘पंचहमी’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार्य करावे

Spread the love  गॅरंटी योजना कमिटी अध्यक्ष रमेश जाधव ; निपाणी तालुका पातळीवरील बैठक निपाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *