Monday , December 8 2025
Breaking News

निपाणीत उद्यापासून राजमणी चॅम्पियन ट्रॉफी फुटबॉल स्पर्धा

Spread the love

 

प्रतीक शहा : ३० हजारांची बक्षीसे

निपाणी (वार्ता) : येथील निपाणी फुटबॉल अकॅडमीतर्फे राजमणी चॅम्पियन्स ट्रॉफी आठव्या हंगामातील फुटबॉल स्पर्धेचे रविवारपासून (ता.२९) आयोजन करण्यात आले आहे. येथील श्री. समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेसाठी ३० हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून फुटबॉल प्रेमींनी याचा लाभ घेण्याचे आवाहन राजमणी ग्रुपच्या प्रतीक शहा यांनी केले आहे.
शहा म्हणाले, या स्पर्धेमध्ये शहर आणि उपनगरातील सहा संघांचा सहभाग आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी नगरातील छावा ग्रुप, छत्रपती शिवाजी चौकातील रायझिंग स्टार युथ क्लब, साखरवाडी फुटबॉल क्लब, महादेव गल्ली येथील एसपी ग्रुप, साईशंकर नगरातील कै. विश्वासराव शिंदे व शिवछत्रपती तरुण मंडळ आणि दिवेकर कॉलनी येथील गणराया युवक मंडळ या संघांचा सहभाग आहे.
स्पर्धेसाठी शहर व परिसरातील १७० खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. कर्णधार व संघमालकांच्या संमतीने १२० खेळाडू निवडले जाणार आहेत. स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवल्या जाणार असून ७ नोव्हेंबर रोजी अंतिम सामना होणार आहे. बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना, समर्थ मंडळ व्यायाम शाळेचे अध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी, निपाणी फुटबॉल अकॅडमीचे अध्यक्ष धनंजय मानवी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होणार आहेत. डॉ. एम. ए. शहा परिवार व मान्यवरांच्या उपस्थितीत
रविवारी (ता.२९) दुपारी स्पर्धेचे उद्घाटन होणार असल्याचे सांगितले. यावेळी शिरीष शहा, सचिन फुटाणकर, ओंकार शिंदे, जॉन मधाळे, प्रशांत आजरेकर, राहुल निंबाळकर, करण माने, शुभम देसाई, गणेश घोडके यांच्यासह निपाणी फुटबॉल अकॅडमीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

इचलकरंजी येथील युवकाचा निपाणी जवळ खून

Spread the love  धारदार शस्त्राचा वापर ; मृतदेह टाकला ओढ्यात निपाणी (वार्ता) : इचलकरंजी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *