निपाणी (वार्ता) : टेम्पो आणि दुचाकी अपघातात एक ठार झाल्याची घटना चांद शिरदवाड येथे घडली. बाळासाहेब पाटील-मड्डे( वय ६२) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
शिरदवाड येथे बेडकिहाळ -बोरगाव मार्गावरून ४०७ टेम्पो (क्र.एम.एच. ११ ए. जी.६६३०) बेडकीहाळच्या दिशेने निघाला होता. दरम्यान आपल्या शेताकडून दुचाकीने येत असलेले बाळासाहेब पाटील हे दुचाकीस्वार यांच्यात रस्ता ओलांडत असताना समोर -समोर दोन्ही वाहनांची धडक झाली. या अपघातात बाळासाहेब पाटील हे रक्तबंबाळ अवस्थेत गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने इचलकरंजी येथील खासगी रुग्णालयास दाखल केले होते. पण उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची नोंद सदलगा पोलीस स्थानकात झाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बिरादार यांच्यासह पोलीस करत आहेत. शेवटी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
पाटील यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे.