कोगनोळी : 1 नोव्हेंबर बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक काळा दिन म्हणून पाळतात. यावेळी महाराष्ट्रातील नेतेमंडळी व कार्यकर्ते पाठिंबा देण्यासाठी बेळगावला मोठ्या प्रमाणात जात असतात. या सर्व लोकांना कर्नाटक शासनाने कर्नाटक प्रवेश बंदी केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी दूधगंगा नदीवर कर्नाटक पोलिसांच्या वतीने बॅरिकेट लावून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या चार चाकी वाहनधारकांची चौकशी करूनच त्यांना कर्नाटक प्रवेश दिला जात आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक वेणुगोपाल यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सूचना केले आहेत.
यावेळी चिकोडी डीवायएसपी जी. बी. गौडर, निपाणी मंडळ पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार, निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी, उपनिरीक्षक डी. बी. कोतवाल, एएसआय एस. ए. टोलगी, एएसआय एम. एस. सुर्यवंशी यांच्यासह अन्य पोलीस उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta