Wednesday , March 4 2026
Breaking News

कुरली कुस्तीत सांगलीचा उमेश चव्हाण एक चक्की डावावर विजयी

Spread the love

 

हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजन : कुस्ती शौकीनांची उपस्थिती

कोगनोळी : कुरली तालुका निपाणी येथे हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त शिंत्रे आखाडा येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरचा उमेश चव्हाण व जाधव आखाडा इस्लामपूर येथील अजय निकम यांच्यात उमेश चव्हाण एक चक्की डावावर विजय मिळवला.
पैलवान उमेश चव्हाण याला अरिहंत उद्योग समुहाचे कार्याध्यक्ष पृथ्वीराज पाटील, ऍड. संजय शिंत्रे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व गदा देऊन सन्मानित करण्यात आले.
या कुस्ती स्पर्धेचे मैदान भूमिपूजन शिंत्रे परिवार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दोन नंबरची कुस्ती किरण जाधव(कोल्हापूर) विरुद्ध रोहन रंडे(मुरगुड) यांच्यात रोहन रंडे विजयी, तीन नंबरच्या कुस्तीत किरण पाटील विरुद्ध अक्षय तांबे(कोल्हापूर) यांच्यात किरण पाटील विजयी, चार नंबरची कुस्ती कुरलीचा सौरभ बागाव विरुद्ध राम पोवार यांच्यात राम पोवार विजयी झाला.
यावेळी लहान मोठ्या अन्य शेकडो कुस्त्या झाल्या. कुस्त्या पाहण्यासाठी शौकीनांनी मोठी गर्दी केली होती.
बक्षिस वितरण निवृत्त सुभेदार मधूकर पाटील, आशिष निकाडे,  के. डी. पाटील, विराज पाटील, दिनकर पाटील, शिवाजी पाटील, विजय माळी, रघुनाथ पाटील यांच्या हस्ते तर पंच म्हणून अण्णासो माळी, बाळू निकाडे, दत्ता पाटील, बाळू माळी, बाळासो पानारे, बाळू दिवटे, शंकर कमते, दत्ता कोकीतकर, नेताजी घराळे, विठ्ठल पाटील, नागेश माळी यांनी पाहिले तर सुत्रसंचलन पैलवान कृष्णात चव्हाण केले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *