तिरंगी लढतीमुळे धाकधूक वाढली : 11 पर्यंत लागणार निकाल
निपाणी (वार्ता) : सोमवारी (ता. 27) बोरगाव नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. 17 प्रभागांसाठी 50 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्र बंद झाले. गुरुवारी (ता.30) निकाल असून या निकालाकडे तालुक्याची नजर लागून राहिली आहे.
युवानेते उत्तम पाटील, अण्णासाहेब हावले गट व जोल्ले दाम्पत्यांना ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. 2023 च्या विधानसभेच्या रणसंग्रामात महत्त्वाची भूमिका ठरलेली ही निवडणूक सर्वांनाच प्रतिष्ठेची बनली. यासाठी सर्वच गटातील नेते कार्यकर्ते सक्रियपणे काम केले आहे. बोरगावच्या इतिहासात प्रथमच अत्यंत चुरशीने व इर्षेने 82 टक्के मतदान झाले. मतदानाचा टक्केवारी पाहिल्यास मतदारांचा कौल कोणाकडे याबाबत अनेक तर्कवितर्कांना ऊत आला आहे.
तिरंगी निवडणूक झाल्यामुळे या ठिकाणी कमालीचा उत्सुकता लागली आहे. सोमवारी झालेल्या निवडणुकीत प्रत्येक नेते मतदारांना हात उंचावून आपल्यालाच मतदान व्हावे असे सांगत होते. मतदारही त्यामुळे संभ्रमावस्था होते. मात्र त्यांचे मतदान कोणाला झाले हे गुरुवारी कळणार आहे. गुलाल आमचाच असे प्रत्येक नेते दावे-प्रतिदावे करीत आहेत. प्रतिस्पर्धी भाजपला शह देण्यासाठी उत्तम पाटील यांनी आपल्या बंधू अभिनंदन यांच्या समवेत कार्य केल्याचे दिसून आले.
भाजप व पाटील गटाला आव्हानात्मक म्हणून अण्णासाहेब हवले गटानेही प्रत्येक प्रभागात प्रचार केला. गेले पाच वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर आपली सत्ता पुन्हा येईल, असा विश्वास पाटील गटाकडून व्यक्त होत आहे. तर निपाणी मतदारसंघ बरोबरच बोरगांव शहरात झालेल्या भाजपाच्या विकास कामावरच भाजपाचे नगरसेवक निवडून येणार, असा विश्वास भाजपकडून वर्तविण्यात येत आहे. तर आतापर्यतच्या कार्यातून आमचेही उमेदवार निवडून येतील असा विश्वास हवले गटाकडून व्यक्त करण्यात येत आहे. तिन्ही गटाकडून दावे-प्रतिदावे होत असले तरीही 30 डिसेंबरच्या निकालानंतरच कुणाला गुलाल लागणार हे काय समजणार आहे.
—–
निपाणी मतदारसंघाचे लक्ष लागलेल्या बोरगाव निकालाकडे आहे. याबरोबरच नगरपंचायतीच्या सर्वांचे लक्ष लागले आहे. भोज ग्रामपंचायतीच्या एका जागेवर पोटनिवडणुकीची झालेल्या मतमोजणीदेखील गुरुवारी (ता.30) बागेवाडी महाविद्यालयात होणार आहे. मतमोजणीसाठी तहसीलदार तालुका निवडणूक अधिकारी डॉ. मोहन भस्मे, उपतहसीलदार अभिषेक बोंगाळे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने तयारी केली आहे. बोरगाव नगरपंचायतीची मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. यासाठी 2 टेबल मांडण्यात आले आहेत. ईव्हीएम मशीनच्या साहाय्याने मतदान झाल्याने दोन तासात निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मतमोजणीच्या एकूण 9 फेर्या होणार आहेत.
Check Also
गट, तट विसरून शेतकऱ्यांनी एकत्रित यावे
Spread the love राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत जत्राट मध्ये बैठक निपाणी (वार्ता) : दोन वर्षापासून …