राजू पोवार; गदग तालुक्यात जनजागृती मेळावा
निपाणी (वार्ता) : उत्पादन खर्चाच्या तुलनेत साखर कारखाने आणि सरकारने एकत्रित ५५०० रुपये प्रति टन दर मिळावा, अशी भूमिका रयत संघटनेचे आहे. त्यामुळे हा दर शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनात विधानसभेत आवाज उठविला जाणार आहे. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संघटित होऊन हे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केले.
गदग तालुकयातील कुर्तकोटी रयत येथे रयत संघटनेचा ६ वा वर्धापन दिन व शेतकरी जागृत मेळावा पार पडला. त्याप्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना राज्य राजू पोवर बोलत होते.
पोवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतीसाठी १० तास थ्री फेज मिळावी, ऊस जळीतग्रस्तांना तात्काळ भरपाई मिळावी, महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी यासह विविध मागण्यासाठी रयत संघटनेने आतापर्यंत गावपातळीपासून जिल्हा पातळी पर्यंत आंदोलने केली आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पुन्हा हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणार आहे. त्यामध्ये शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कर्नाटक रयत संघटना अध्यक्ष चुन्नापा पुजारी, शशिकांत पडसलगी, सुरेश परगण्णावर, महेश सुभेदार, प्रकाश नाईक, वासू पारोई, विजय सुंकद, आशा एम. यांच्यासह
रयत संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta