निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत क्रेडिट (मल्टिस्टेट) संस्थेच्या अक्कोळ शाखेचा दहावा वर्धापन दिन उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यानिमित्त सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विजय हतगीणे हे कुडित्रे येथील डी. सी. नरके जुनियर कॉलेजमधून सेवानिवृत्त झाल्याबद्दल, ग्राम पंचायत सदस्य दीपक कोळी यांना राष्ट्रीय आदर्श सामाजिक सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल व सानिका सुभाष नारे हिची भारतीय नौदल सेनत निवड झाल्याबद्दल उत्तम पाटील यांच्या व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गाव कामगार राजू पाटील, इंद्रजीत सोळांकुरे, युवराज पाटील, निरंजन पाटील- सरकार, गजानन कावडकर, मलगोंडा पाटील, विवेकानंद सोळांकुरे, सुहास पठाडे दिलीप पठाडे, राजगोंडा पाटील, सिदनाळे, रितेश पाटील, समीर मगदूम, सुनील मगदूम, पद्मराज पाटील, निता राऊत यांच्यासह संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते. व्यवस्थापक भरतेश बागे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta