आमदार सतेज पाटील; अरिहंत मल्टीस्टेट संस्थेच्या कोल्हापूर शाखेचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : सहकार महर्षी रावसाहेब पाटील (दादा) यांच्या नेतृत्वाखालील श्री अरिहंत को ऑप क्रेडिट सोसायटी संस्था ही कर्नाटक राज्यात सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळवली आहे. सर्वांच्या विश्वासाला पात्र राहिलेली ही संस्था मल्टीस्टेटच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश केली आहे. कोल्हापूर येथे दुसऱ्या शाखेचा शुभारंभ केला आहे. कोल्हापुरातील सुख समृद्धीचा नवा पत्ता म्हणजेच ही अरिहंत संस्था असल्याचे मत माजी मंत्री, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर शाहूपुरी तिसरी गल्ली येथे श्री अरिहंत को-ऑप. क्रेडिट सोसायटी बोरगाव (मल्टीस्टेट) या संस्थेचा 58 व्या शाखेचा शुभारंभ कोल्हापूर मठातील स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टाारक महास्वामी, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यावेळी पाटील बोलत होते.
उत्तम पाटील यांनी स्वागत केले.
संस्थेचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांनी, अर्थव्यवस्थेत एक पाऊल पुढे म्हणून आपण मल्टीस्टेट या माध्यमातून कर्नाटका बरोबरच जवळच्या महाराष्ट्र राज्यातही आपली शाखा प्रारंभ केली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी विश्वासाच्या बळावर संस्थेच्या अनेक ठिकाणी शाखा उघडल्या व सर्वच शाखांमध्ये स्वच्छ कारभार व चोख व्यवहार केल्याने अरिहंत संस्था सर्वांच्या विश्वासाला पात्र राहिली आहे. कोल्हापूर येथे आपल्या संस्थेचे आर्थिक व्यवहार आणखी वाढावे, संस्थेच्या सोयी सुविधांचा लाभ कोल्हापूर येथील नागरिकांनाही मिळावेत, या हेतूने शाखा प्रारंभ केली असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास राजेश लाटकर, महावीर घाट, विजयकुमार शेट्टी, अभिजीत मगदूम, आशिष शहा, धनंजय दुगे, सूर्यकांत पाटील, सुरेश लाटे, सुरेंद्र जैन, संजय शेटे, सुजय होसमणी, प्रदीप भाई कापडी, किरण डूनुंग,आशिष शेट्टी, धैर्यशील घाडगे, सतीश आवटे, अशोक उपाध्ये, मनीष शेट्टी, अश्विन रोटे, पल्लवी रोटे, एन. एन. पाटील, कुमार गुंडे, विक्रांत नाईक, प्रशांत कापडी, अजित पाटील बेनाडीकर, रामदास पाटील, राकेश निल्ले, विक्रांत नाईक, संस्थेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, राकेश चिंचने, कुमार पाटील, निरंजन पाटील, गजानन कावडकर, वर्धमान पाटील, शांतिनाथ तेरदाळे, शाखाधिकारी सुनील घाळी यांच्यासह कोल्हापूर येथील विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta