निपाणी (वार्ता) : डेंगी सदृश्य आजाराने विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.९) निपाणी येथे घडली आहे. येथील साखरवाडीतील व सध्या सावंत कॉलनीत वास्तव्यास असणाऱ्या हर्ष सचिन कदम (वय १२) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे निपाणी शहर आणि उपयोगात खळबळ उडाली आहे.
हर्ष कदम हा पाचवीच्या वर्गात शिकत होता. गेल्या आठवड्यात चालला ताप येऊन रक्तातील पेशींची संख्या कमी झाली होती. त्यानंतर वैद्यकीय उपचारात डेंग्यूचे निदान झाले होते. पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापुर येथे हलविण्यात आले होते. मात्र रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने गुरुवारी (ता.९) सकाळी हर्ष याची प्राणज्योत मालवली.
ऐन दिवाळीत हर्ष याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या मागे आई, वडील, बहिण, चुलते, आजोबा असा परिवार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta