निपाणी (वार्ता) : येथील श्री संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिराने पिर दस्तगीर साहेब दर्गा आणि संत बाबा महाराज यांच्या समाधी स्थळी मानक-यांच्या उपस्थितीत दीपावली निमित्त अभंगस्नान घालून अभिषेक घालण्यात आला.
पहाटे चव्हाण वाड्यातील बाबा महाराज यांच्या पुतळ्याला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर दर्गाह येथे हजरत पिराने पीर दस्तगीर साहेब यांचे तुरबत आणित विद्या मंदिर शाळेजवळील संत बाबा महाराज चव्हाण यांच्या समाधी स्थळी अभिषेक तसेच आरती करून फराळ वाटप करण्यात आले. यावेळी चव्हाण वारस नगरसेवक बाळासाहेब देसाई -सरकार, संग्राम सरकार, रणजित देसाई -सरकार, पृथ्वीराज चव्हाण विवेक मोकाशी, संजय माने, जयराम मिरजकर, प्रभाकर पाटील, बाळू पोतदार, माजी नगराध्यक्ष पप्पू चव्हाण, विलास गाड्डीवड्डर, अनिल शिंदे, बाळू मोरबळे, युवराज पोळ, भूपेंद्र माळवे, सुजित गायकवाड, पिंटू कमते, शीतल बुडके, सुधाकर बुडके, निलेश पावले, संभाजी मुगळे, विश्वास माळी, प्रवीण हेगडे, संतोष गंथडे, शरद मळगे, सदाशिव डवरी, अनिल संगावकर, सुनील वाडकर यांच्यासह साळी समाज व मानकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta