Tuesday , March 3 2026
Breaking News

बोरगांव बस स्थानकातून महिलेची चेन लंपास

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील बस स्थानकात बसमध्ये चढत असताना एका महिलेचे अज्ञातानी चेन लंपास केल्याची घटना मंगळवारी (ता.१४) घडली. सदर महिलेने आरडाओरड केल्यानंतर चेन चोरी झाल्याची घटना उघडकीस आली.
बोरगाव येथील एक महिला बोरगाव बस स्थानकातून हुपरी- कुरुंदवाड बसमध्ये चढत असताना बसमध्ये आत गेल्यानंतर आपल्या गळ्यातील सोन्याची चेन कुणीतरी चोरले आहे. असे लक्षात आले सदर चोट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन चोरी केल्याचे समजले. महिला आरडा ओरड केल्यानंतर आपले सोने चोरी झाल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी भेट घेऊन बसमधील सर्व प्रवाशांची तपासणी केली. मात्र या ठिकाणी कुणाकडेच चेन न मिळाल्याने पुन्हा बस सोडण्यात आली. बोरगाव बस स्थानकात वारंवार अशी घटना घडत आहेत. या ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे गरजेचे आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गेल्या अनेक महिन्यापासून अशा चोरीच्या घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘पंचहमी’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार्य करावे

Spread the love  गॅरंटी योजना कमिटी अध्यक्ष रमेश जाधव ; निपाणी तालुका पातळीवरील बैठक निपाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *