चव्हाणवाडी येथील घटना
निपाणी (वार्ता) : चोरट्यानी लक्ष्मीपूजनला पुजलेले एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व एक हजाराची रोकड असा ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. गणेश बाळासाहेब शिंदे (रा. चव्हाणवाडी) असे चोरी झालेल्या घरमालकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी, गणेश शिंदे यांच्या घरात रविवारी रात्री उशिरा लक्ष्मीपूजन करण्यात आले. लक्ष्मीपूजनावेळी एक तोळ्याचे मंगळसूत्र पुजले होते. तर एक हजाराची रोकड लक्ष्मीसमोर ठेवलेली होती. चोरट्याने पहाटेच्या सुमारास खिडकीतून एक तोळे सोन्याचे मंगळसूत्र व एक हजाराची रोकड असा एकूण ५१ हजाराचा मुद्देमाल चोरट्यानी लंपास केल्याची माहिती गणेश बाळासाहेब शिंदे यांनी दिली.
चव्हाणवाडी हे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने या चोरीच्या घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झालेली नाही.
Belgaum Varta Belgaum Varta