निपाणी (वार्ता) : हिंदू धर्मामध्ये दीपावलीचा सण हा सर्वात मोठा सण मानला जातो. हा सण आपल्या परिवारासोबत साजरा करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या परिवारासोबतच असते. या आनंदापेक्षा गोमातेच्या सेवेला महत्त्व देवून गो सेवा हीच ईश्वर सेवा, समजून हिंदू हेल्पलाइनच्या माध्यमातून ‘मी हिंदू धर्म रक्षक अभियान’ प्राणलिंग स्वामींनी चालू केले होते. या अभियानातील तरुणांनी आपली दिवाळी गोमतेला १० टनाहून अधिक ऊस देवून साजरी केली.
शहरांमधील प्रत्येक व्यापारी आपल्या दुकानात लक्ष्मी पूजन आणी सजावटीसाठी ऊसाचा वापर केला. यावेळी हिंदू हेल्प लाईनकडून समाधी मठ गोशाळेसाठी ऊस देण्याचे आवाहन निपाणी व्यापारी वर्गाला केले होते. याला प्रतिसाद देत १० टनपेक्षा अधिल ऊस समाधी मठ गोशाळेला निपाणी व्यापारी वर्गाकडून अर्पण करण्यात आले. यावेळी ‘मी हिंदू धर्म रक्षक अभियान’ मधील तरुणांनी या केलेल्या उपक्रमाचे निपाणी परिसरातून कौतुक होत आहे. यावेळी ऊसाची वाहतूक करण्यासाठी गुरुकुल अकादमीचे चारुदत्त पावले यांनी विनामूल्य टॅक्टर- ट्रॉली उपलब्ध करून दिली.
यावेळी विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प्राणलिंग स्वामीजी म्हणाले, ‘मी हिंदू धर्मरक्षक’ या अभियानामध्ये सहभागी झालेल्या तरुणांनी गोमतेच्या सेवेला प्रधान्य देवून ऊस गोळा केला, ही अभिमानस्पद गोष्ट आहे. यावेळी पाऊस कमी झाल्यामुळे चाऱ्याची टंचाई होणार आहे. पण असे तरुण जर समजहितासाठी काम करणारे असतील तर आपण कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो. या तरुणाचा आदर्श इतर तरुणांनी घेवून समाजाहितासाठी कार्य करावे असे आवाहन प्राणलिंग स्वामींनी केले.
यावेळी गोरक्षक आकाश स्वामी मनोगत व्यक्त केले.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी अभिजीत सादळकर, राजेंद्र नार्वेकर, आप्पासाहेब माळगे, राजेंद्र सुतार, अजित सादळकर, सागर श्रीखंडे यांच्यासह ‘मी हिंदू धर्म रक्षक’अभियानाती ल कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta