निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील युवा नेते उत्तम रावसाहेब पाटील यांना कर्नाटक राज्य सहकार क्षेत्र यांच्याकडून देण्यात येणारा मानाचा ‘सहकार रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. सोमवारी (ता.२०) विजापूर येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कर्नाटक राज्य सरकारकडून देण्यात येणारा हा सहकार रत्न पुरस्कार युवा नेते उत्तम पाटील यांना मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले होत आहे.
सन २००८ साली अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक रावसाहेब पाटील (दादा) यांना हा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर पाटील घराण्यात हा दुसऱ्यांदा पुरस्कार मिळाला आहे.
उत्तम पाटील हे वडील रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पंचवीस वर्षापासून सहकार क्षेत्रात अविरतपणे कार्य करीत आहेत. गेल्या पंधरा वर्षापासून बोरगाव येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या अध्यक्ष पदाची त्यांनी धुरा सांभाळली आहे. शेतकरी, सभासद व गरजवंतांना वेळेत पत निर्माण करीत आपला कृषी संघ सहकार क्षेत्रासह इतर क्षेत्रातही त्यांनी प्रगती साधली आहे. सहकार क्षेत्रात काम करीत असताना राजकारण बाजूला ठेवून कार्य केल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखालील सर्वच सहकारी संस्था आदर्श रूपात आले आहेत. त्यांनी सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रालाही प्राधान्य देत त्याच्या माध्यमातून अनेक वंचित गोरगरीब कुटुंबांना न्याय दिला आहे. महापूर, कोरोना अशा परिस्थितीतही लोकांना आर्थिक मदत करण्याबरोबरच त्यांना जीवनावश्यक वस्तूही पुरवठा केल्या आहेत. बेळगाव जिल्हासह निपाणी तालुक्यातही सहकार क्षेत्र वाढावे, यासाठी त्यांनी प्रयत्न करुन नवीन ७ कृषी पत्तीन सहकारी संघ मंजुरी मिळवून दिली आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक शेतकरी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेत आहेत. सहकार क्षेत्र हे एक समाजाभिमुख क्षेत्र व्हावे, हा उद्देश त्यांनी ठेवल्याने त्यांच्या कार्याची पोचपावती पाहून कर्नाटक राज्य सरकारने त्यांना सहकाररत्न पुरस्कार जाहीर केला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी विजापूर येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta