निपाणी (वार्ता) : येथील व्हीएसएम जी. आय. बागेवाडी प्राथमिक शाळेत बाल दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी जुन्या खेळांना उजाळा दिला.
प्रारंभी डॉ. एस. बी. पाटील, प्राचार्य डॉ. एन. एस. मादनावर, वाय. बी. हंडी व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
डॉ. एस. बी. पाटील यांनी, सध्याची युवा पिढी मोबाईल, टीव्हीच्या जंजाळात अडकली आहे. त्यामुळे मैदानी खेळ बंद होत आहेत. परिणामी विद्यार्थी आणि युवा पिढी भरकटत चालली आहे. या परिस्थितीमध्ये जुन्या खेळांना उजाळा देऊन वेगळा उपक्रम राबवल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ. एन. एस. मदन्नावर, जी. एम. कमते, वाय. बी. हंडी, डी. के. नाईक, मनिषा महाजन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा केल्या होत्या. तर अनेक जुन्या खेळांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमास एन. जी. मोकाशी, एम. के. मगदूम, जे. बी. जोशी, पूजा कोतमिरे, एस. एम. संकपाळ, के. बी. बडिगेर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta