डॉ. गडेद ; गांधी रुग्णालयात रक्तदान शिबिर
निपाणी (वार्ता) : कोरोना काळापासून रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. रक्तदानमुळे लाखो लोकांना जीवदान मिळते. मानवी रक्ताशिवाय पर्याय नसल्याने रक्तदानासाठी युवकांनी पुढे यावे. रक्तदान केल्यास सहन शक्तीही वाढते. पूर्ण शारीरिक आरोग्यासाठी रक्तदान फायदेशीर ठरते. रक्तदान केल्यानंतर रक्तातील प्लाज्मामध्ये ल्युकोसाइटची वृद्धी होते. ल्युकोसाइट् कोणत्याही गंभीर आजरा पासून वाचन्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती तयार करत असल्याचे मत अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. गडेद यांनी व्यक्त केले.
बेळगाव जिल्हा पंचायत, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते, चिक्कोडी अप्पर जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण, बेळगाव बीम्स रक्त भांडार, निपाणी समुदाय आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने येथील महात्मा गांधी रुग्णालयात आयोजित रक्तदान शिबिरात ते बोलत होते.
शिबिरामध्ये विविध फाउंडेशन, संघ, युवक मंडळ, आशा कार्यकर्ते, रुग्णालया तील कर्मचारी आशा कार्यकर्त्यासह ९५ नागरिकांनी रक्तदान केले. यावेळी मानवारांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
शिबिरास डॉ. सीमा गुंजाळ, डॉ. गणेश चौगुले, डॉ. संतोष गाणीगेर, डॉ. ईश्वर पत्तार, डॉ. प्रणव देशपांडे यांच्यासह कर्मचारी होते.