उत्तम पाटील ; निपाणीत सत्कार समारंभ
निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जडणघडणीमध्ये सहकाराची भूमिका महत्त्वाची आहे. आतापर्यंत आपण सहकार्याच्या माध्यमातून मतदार संघातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना विविध योजना राबविल्या आहेत. त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावत आहे. यापुढील काळात शासनाच्या विविध योजनासह अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही उत्तम पाटील यांनी दिली. कर्नाटक राज्याचा सहकारत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल निपाणी मतदारसंघातील शेतकरी व कार्यकर्त्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्कारला उत्तर देताना ते बोलत होते.
यावेळी नगरसेवक दत्ता नाईक, संजय पावले, दिलीप पठाडे, दीपक सावंत, शौकत मनेर, विनायक वडे, राजेंद्र कंगळे, अरिहंतचे संचालक शशीकुमार गोरवाडे, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, इम्रान मकानदार, शिरीष कमते, महेश पाटील, प्रा. सुरेश कांबळे, कुन्नूरमधील चेतन चेंडके, संतोष कोळी, मानाजी चेंडके, महेंद्र जाधव, निरंजन पाटील- सरकार, गजानन कावडकर, अमित शिंदे यांच्यासह निपाणी, शेंडूर, गोंदूकुप्पी, शिरगुपी पांगिरे- बी, गायकवाडी, अंमलझरी, नांगनूर, श्रीपेवाडी, पडलीहाळ, कुन्नूर, मांगुर, लखनापूर परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta